V3I3P102

भारतामधील रासायनिक खतांचे उत्पादन व वितरण  (2023-24 ते 2025-26) A Study of Chemical Fertilizer Production and Distribution in India (2023 & 24 to 2025 & 26)

दर्शनकुमार ना. चांभारे

Abstract

खत हा भारतातील कृषी उत्पादनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेती उत्पादनवाढीत रासायनिक खतांचा मोठा वाटा असून हरित क्रांतीनंतर त्यांचा वापर सातत्याने वाढला आहे. प्रस्तुत संशोधनात भारतातील खतांचे उत्पादन आणि उपयोग (विक्री) यांचा 2023-24 ते 2025-26 या कालावधीतील तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासासाठी रसायन व खते मंत्रालय, लोकसभा व राज्यसभा प्रश्नोत्तरे तसेच Department of Fertilizers यांच्या अधिकृत आकडेवारीचा वापर करण्यात आला आहे. संशोधनातून असे दिसून आले की युरिया, डीएपी, एनपीके, एमओपी आणि एसएसपी या प्रमुख खतांच्या उत्पादन व वापरामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. विशेषतः एनपीके व एसएसपी खतांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. भारताने युरिया व एनपीके उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली असून आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. तथापि, डीएपी व एमओपी या खतांसाठी परदेशी कच्च्या मालावर अवलंबित्व कायम आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविणे, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर प्रोत्साहित करणे आणि संतुलित खत वापर धोरण राबविणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Keywords:

खत, युरिया, डीएपी, एनपीके, एमओपी, एसएसपी, उत्पादन, उपयोग, आत्मनिर्भरता, Nutrient Based Subsidy (NBS)